तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । आमच्या सरकारने असंख्य असे उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरद्वारे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग नागरिकांनी अविचल मनोधैर्य आणि साध्य केलेल्या कामगिरीचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आमच्या दिव्यांग भगिनी आणि बंधूंनी दाखवलेले अविचल मनोधैर्य आणि साध्य केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने असंख्य असे उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत आणि त्यांना चमकदार कामगिरी करण्यासाठी सक्षम केले आहे. दिव्यांगांना सहज प्रवेश शक्य व्हावा, यासाठी आमचे सरकार तितकेच आग्रही असून, दिव्यांगांसाठी आखलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांत तसेच दिव्यांगांसाठी पायाभूत सुविधांचा मंच तयार करण्यात आल्याच्या घटनेत त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करणार्या व्यक्तींच्या कार्याचीही मी प्रशंसा करतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग नागरिकांनी अविचल मनोधैर्य आणि साध्य केलेल्या कामगिरीचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.