World Health Day In Nashirabad : जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि त्याचे नेतृत्व जागतिक आरोग्य संघटना (WHO) करते. १९४८ मध्ये WHO ची स्थापना झाली आणि दरवर्षी जागतिक आरोग्य प्रणाली आणि एकूणच आरोग्याच्या समस्येकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी एक विशिष्ट आरोग्य थीम अधोरेखित केली जाते. जागरूकता वाढवणे, निरोगी पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि सरकार आणि संघटनांना आरोग्य व्यवस्था आणि एकूणच कल्याण सुधारण्यासाठी अर्थपूर्ण कृती करण्यास प्रेरित करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे.
आज दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद ता.जि.जळगाव येथे गोदावरी फौंडेशन संस्थेच्या विद्यार्थी यांच्याकडून पथनाट्य साजरे करण्यात आले त्या माध्यमातुन मानसिक आरोग्य,उष्माघात,पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे *“आरोग्य दायी सुरवात आशादायी भविष्य”* हे या वर्षाचे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेणे घोषित केलेले आहे त्याला अनुसरून प्रा. आ. केंद्र नशिराबाद द्वारे 100 दिवस कार्यक्रम अंतर्गत आज *आदर्श बालक मोहीम* चे शुभारंभ करण्यात आले व प्रथम तीन बालकांना शालेय उपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
या पुढे प्रत्येक महिन्याला अशी मोहीम राबविण्यात येणार आहे यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोहत्सान मिळेल. तसेच गरोदर महिलांचीही तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ करिष्मा जैन यांनी सर्व आशा स्वयंसेविका यांचा त्यांनी वर्षभर केलेल्या आरोग्य सेवेसाठी सत्कार करण्यात आला.त्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.शोएब पटेल व डॉ.तुषार राणे गोदावरी फाउंडेशन चे श्री. पियुष वाघ व त्यांचे विद्यार्थी व आरोग्य सहाय्यक श्री.लुकमान तडवी आरोग्य सहाय्यिका श्रीमती प्रतिभा घुगे औषध निर्माण अधिकारी श्री.भावेश थोरात आरोग्य सेवक श्री.प्रकाश पाटील श्री.दिपक तायडे आरोग्य सेविका श्रीमती.सुवार्ता ढालवाले उपस्थित होते.