---Advertisement---

World Tiger Day : वाघांची वाढती संख्या टिकवून ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान

by team

---Advertisement---

नवी दिल्ली : वाघ हा जंगलांतील जिवंतपणा, चैतन्य सांभाळून ठेवणारा प्राणी! मात्र, दिवसेंदिवस वाघांची घटती संख्या आपल्या निसर्गावर, पर्यावरणावर आणि परिसंस्थेवर वाईट परिणाम करीत आहे. बेकायदेशीर शिकार, हवामान बदल आणि मानवाकडून वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचा होणारा नाश यामुळे ते सातत्याने नामशेष होत आहेत. यामुळे वाघ संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी दरवर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो.

वाघ हा एक अद्वितीय प्राणी आहे, जो पर्यावरणातील आरोग्य आणि विविधतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा एक शीर्ष शिकारी आहे, जो अन्नसाखळी टिकवून ठेवण्यातील महत्त्वाचा घटक आहे. तो जंगली प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो, ज्यामुळे शाकाहारी प्राणी आणि ते ज्या वनस्पतींना आहार देतात, त्यामधील संतुलन राखले जाते. त्यामुळे जंगलात वाघांचे अस्तित्व हे पर्यावरणाच्या कल्याणाचे सूचक आहे. वाघाच्या प्रजाती लुप्त होणे हे परिसंस्था पुरेशा प्रमाणात संरक्षित नसल्याचा संकेत आहे. त्यामुळे एकीकडे वाघांची संख्या वाढत असली तरी, हे वाघ टिकवून ठेवणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे.

29 जुलै 2010 रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ‘ परिषदेत हा दिवस  जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ‘ संवर्धनासाठी जनजागृती करणे, हे याचे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल, ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो.

अलिकडील अहवालानुसार, 20 व्या शतकाच्या सुरुवातीस सुमारे 95 टक्के वाघ नष्ट झाले होते. केवळ 5 टक्के म्हणजे 3900 वाघ जगातील जंगलात आहेत. मात्र, संपूर्ण विश्वातील वाघांच्या एकूण संख्येच्या अर्धेअधिक वाघ एकट्या भारतात असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष आज भारतातील जंगलांकडे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी भारतातील वाघांच्या सद्य:स्थितीबाबतचा अहवाल म्हैसूर येथे प्रकाशित करून भारतात वाघांची संख्या 2967 वरून 3167 वर पोहोचली असल्याचे जाहीर केले.

1973 साली प्रोजेक्ट टायगर सुरू झाला. प्रारंभी नऊ व्याघ्र आरक्षित करण्यात आले होते. आज 50 वर्षानंतर 53 व्याघ्र प्रकल्प आरक्षित आहेत. यासाठी 75 हजार वर्ग किमीचा परिसर कव्हर केलेला आहे. इतक्या दूरपर्यंत पसरलेल्या परिसरात वाघांची मोजणी करणे इतके सोपे काम नक्कीच नाही. प्रोजेक्ट टायगरला सुरुवात झाली तेव्हा वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी वाघांच्या पायांच्या ठसे ओळखण्यासाठी ग्लास आणि बटर पेपरचा उपयोग केला होता. माणसासारखेच वाघाचाही स्वत: एक ‘युनिक फूटप्रिंट’ असतो. यामुळे वाघांना नेमके ट्रॅक करण्यास मदत होते. यासाठी फॉरेस्ट रेंजर्स वाघांच्या पायांचे ठसे अचूकपणे शोधून काढतात आणि भविष्यात त्या वाघाला ट्रॅक करण्यासाठी बटर पेपरवर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असतात. हे वाघांचे ठसे ट्रॅक करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच लागतात.अनेक वर्षांच्या सरावानंतर वाघांना मोजण्याच्या पद्धतीत बदल आणि विकास झाला.

यामुळे वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी कॅप्चर-मार्क-अ‍ॅण्ड-रिकॅप्चर पद्धतीचा वापर करू लागले. या पद्धतीनुसार, मोठ्या प्रमाणावर सॅम्पल जमा केले जातात. या आधारावर वाघांच्या संख्येचा अंदाज घेऊन नोंदणी केली जाते. यानंतर त्यांच्यावर कोणतेही नुकसान न करणारे ठसे लावून पुन्हा त्यांच्या समूहात सोडण्यात येते. यानंतर एका छोट्या समूहाला पकडून त्यांचे ठशांची नोंदणी केली जाते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---