अडावद, ता.चोपडा : येथून जवळच असलेल्या उनपदेव तीर्थक्षेत्राचे यात्रा महोत्सव 31 डिसेंबर रोजी सुरु करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि प्रमोद वाघ आणि वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांच्या हस्ते नारळ वाढवून व जलपुजन करण्यात आले. वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सरपंच बबनखा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रभू श्री रामचंद्रांच्या पावलांनी पावन झालेल्या, सातपुड्याच्या पर्वत रांजीत स्थित असलेल्या या तिर्थक्षेत्राच्या निसर्गरम्य वातावरणात पौष मासापासून महिनाभर यात्रोत्सव सुरु होतो. पुराणानुसार, प्रभू श्रीराम यांनी उनपदेव येथे आले असतांना प्रभू श्रीरामांनी याठिकाणी दुर्धर आजाराने पीडित असलेल्या शरभंग ऋषींसाठी गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली अशी पुराणात अख्यायीका आहे. आजही त्या ठिकाणी गोमुखातून गरम पाणी वाहते आणि हे पाणी कसे वाहते, याचा प्रश्न अनेक भक्तांना पडत असतो.
उनपदेव तिर्थक्षेत्र गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, आणि महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरातमधून हजारो भाविक येथे येतात. याप्रसंगी माजी सरपंच भावना माळी, भारती महाजन, यासु बारेला, विजीता पाटील, कुसुम पाटील, हनुमंत महाजन, सचिन महाजन, पी.आर.माळी, कृष्णा महाजन, एम.के.शेटे, लोकेश काबरा, नामदेव पाटील, सुरेश बाहेती, शशिकांत कानडे, नरेंद्र पाटील, मनोहर पाटील, लक्ष्मण पाटील, रविंद्र महाजन, पंकज महाजन, संदीप महाजन, शांताराम पवार, ग्रामविकस अधिकारी पी.डी.सैंदाणे, पप्पू चौधरी, जावेद खान, कालु मिस्तरी, शकिलोद्दीन शेख, जुनेद खान, अल्ताफखा पठाण, पोउनि राजु थोरात, ज्ञानेश्वर सपकाळे, सतिष भोई, वनविभागाचे वनपाल योगेश साळुंखे, वनश्री दशरथ पाटील, संजय माळी, राजु पाटील आदींसह वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.