---Advertisement---

Yawal Crime News : चोरट्या परप्रांतीय महिलांचे त्रिकूट जाळ्यात

by team
---Advertisement---

यावल : शुक्रवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल लांबवणाऱ्या परप्रांतीय त्रिकूटाला यावल पोलिसांनी अटक केली आहे.  या त्रिकुटाला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सोनीपत सोनी सोलंकी (२१), मकरानीबाई सुनील शिसोदिया (२५), नसीबाबाई धनराज पवार (३५) व एक अल्पवयीन (सर्व रा. कडाऱ्या, ता.लखाडा, जि.उज्जैन, मध्य प्रदेश) अशी संशयीतांची नावे आहेत.  या चौघांनी शुक्रवारी सायंकाळी बाजारातून मुस्तुफा खान यांचा मोबाईल चोरी केला.  त्याचवेळी ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर यावल पोलिसांना पाचारण करण्यात आले.

चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ९४ हजार ९८ रुपये किंमतीचे सहा मोबाईल आढळले. याप्रकरणी मुस्तफा खान मेहबूब खान यांनी यावल पोलिसात तक्रार दिली.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment