जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची मुख्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी योगेश गंगाधर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. ठाकूर यांनी बुधवारी आपला पदभार स्वीकारला.
तसेच जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांची नाशिक एसीबीत बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनीदेखील पदभार स्वीकारला आहे. नवघरे या राज्य गुप्तवार्ता विभागातून बदलून आल्या आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधून निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.