Yogi Adityanath On Abu Azmi: औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल, मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते . त्यानंतर आज, बुधवारी अखेर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना निलंबित करण्यात आलं आहे.
नेमकं काय म्हणले योगी आदित्यनाथ ?
अबू आझमींच्या या वक्तव्याचे पडसाद आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही उमटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमींचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांना पक्षातून काढा किंवा उत्तर प्रदेशात पाठवा. उत्तर प्रदेशात अशा लोकांचा चांगला उपचार होतो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : DA Hike: होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट! DA वाढीवर आज शिक्कामोर्तब होणार?
योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पक्ष अशा लोकांना आदर्श म्हणजे जे जनतेवर जिझिया कर लावत होते. या लोकांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी. या लोकांना उत्तर प्रदेशात पाठवून द्या, त्यांचा चांगला उपचार केला जाईल. जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिमान करण्याऐवजी औरंगजेबचे गुणगान करतो. त्याला आदर्श मानतो. त्याला व्यक्तीला आमच्या देशात राहण्याचा अधिकार नाही? समाजवादी पक्षाने त्याचे उत्तर दिले पाहिजे.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, एकीकडे तुम्ही महाकुंभावर टीका करत आहात. दुसरीकडे औरंगजेबचे कौतूक करत आहात. त्या औरंगजेबने देशातील मंदिरे नष्ट केली. तुम्ही त्या आमदारावर कारवाई का नाही करत? त्याच्या वक्तव्याचा निषेध का नाही करत? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला विचारला.
काय म्हणाले होते अबू आझमी?
औरंगजेबाचा इतिहास चुकीचा दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची स्थापना केली, औरंगजेबाचा सैनिक हा बनारसमधल्या एका तरुणीशी बळजबरी करत होता, तिला लग्न करण्याची जबरदस्ती करत होता. तेव्हा औरंगजेबाने दोन हत्तींमध्ये बांधून त्या सैनिकाची हत्या केली. तेथील पंडितांनी औरंगजेबासाठी मस्जिद बांधून दिली, असं अबू आझमी यांनी सांगितलं होतं .
तसेच अबू आझमी यांना तुम्ही औरंगजेबाला क्रूर शासक मानता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही, औरंगजेब हा उत्तम शासक होता. तेव्हाची लढाई राजकीय होती. तेव्हाची लढाई हिंदू-मुसलमान अशी लढाई नव्हती’ असं अबू आझमी यांनी म्हटलं होतं.