---Advertisement---

योगी- रजनीकांत बघणार ‘जेलर, वाच सविस्तर

by team
---Advertisement---

लखनौ: दक्षिण भारतीय चित्रपटांचे सुपरस्टार रजनीकांत शुक्रवारी लखनौमध्ये आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांचा ‘जेलर’ हा नवीन चित्रपट बघायचा आहे, असे त्यांनी येथे सांगितले.

रजनीकांत यांना जेव्हा विचारण्यात आले की ते सीएम योगींना भेटणार आहेत का, तेव्हा त्यांनी ‘होय, मी त्यांच्यासोबत चित्रपट  पाहतोय’ असे उत्तर दिले.चित्रपट पाहण्याबाबत सीएम योगी यांच्याकडून अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

शनिवारी म्हणजेच आज रजनीकांत योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे मानले जात आहे तसेच दोघेही एकत्र चित्रपट पाहू शकतात. रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यावर रजनीकांत म्हणाले की, सर्व काही देवाची कृपा आहे. ते 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान यूपी दौऱ्यावर आले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment