आपल्याला इंडिया नको, विश्वगुरू भारत हवाय!

अग्रलेख

केंद्रात भाजपाशिवाय अन्य कुठल्याही पक्षाचे वा (Vishwaguru India) आघाडीचे सरकार असले की, सगळे काही सुरळीत असते. कुठेही अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अबाधित असते. सामाजिक सौहार्दही कायम असते. शेजारच्या चीन आणि पाकिस्तानशी संबंधही चांगले असतात, सीमाही सुरक्षित असतात. पण, भाजपाची सत्ता आली की, या सगळ्यांचीच उणीव भासायला लागते की काय? काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआची सत्ता गेली, डाव्यांची बंगालमधील राजवट खालसा झाली तेव्हापासून काँग‘ेससह डाव्यांनी मोदी सरकारविरोधात देशातील जनमानस कलुषित करण्याचे आखलेले षडयंत्र आज उत्पात माजवताना दिसत आहे.

केवळ देशातच नव्हे, तर परदेशात जाऊन (Vishwaguru India) पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्याचे पाप विरोधी पक्षाचे नेते करीत असतात. त्याच्याच परिणामी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी मोदींबाबत अनुदार आक्षेपार्ह उद्गार काढण्याची हिंमत केली. एकाही विरोधी नेत्याने बिलावलच्या वक्तव्याचा साधा निषेधही केल्याचे ऐकिवात नाही. देशांतर्गत राजकारणात आणि तेही निवडणूक काळात मोदींवर टीका केली जाणे समजण्यासारखे आहे. पण, विदेशात जाऊन आपल्याच देशाची आणि पंतप्रधानांची बदनामी करून आपण काय साध्य करणार आहोत, याचा कुठेतरी गांभीर्याने विचार व्हायला हवा की नको? सध्या चीनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर अविश्वास व्यक्त केला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सरकारकडून भूमिका स्पष्ट केल्यानंतरही अविश्वास व्यक्त केला जाणे हा लष्कराचाही अवमान मानला पाहिजे.

केंद्रात 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Vishwaguru India) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. या सरकारने पाच वर्षांत अनेक मोठमोठी कामं करून 2019 च्या निवडणुकीत 2014 पेक्षाही मोठा विजय संपादन केला. अर्थात, सरकारने केलेल्या कामांवर जनतेने शिक्कामोर्तब केले. पण, जनतेने उखडून फेकलेल्या विरोधकांना हा बदल अजूनही रुचलेला नाही, पचला तर मुळीच नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविल्याने धाबे दणाणलेल्या विरोधी पक्षांनी मुद्दे नसतानाही गदारोळ माजवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेला मोदींचा दुसरा विजय तर त्यांच्या जिव्हारी लागलेला दिसतोय. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध भाषा, प्रांत, पंथ, धर्म, चालीरीती अशी सगळी वैशिष्ट्ये असलेला जगाच्या पाठीवरील एकमेव देश म्हणजे भारत. हजारो वर्षांपासून भारताची संस्कृती टिकून आहे. तिच्यावर अनेक आघात झाले. पण, सगळे आघात सहन करूनही भारतीय संस्कृती दिमाखात वाटचाल करते आहे. वैविध्य असल्याने कोणत्याही मुद्यावर सगळ्यांचे एकमत होणे शक्य नाही. शिवाय, आपल्या संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला विचारस्वातंत्र्य दिले आहे. ते अबाधित आहे.

पंतप्रधान मोदींना शिव्यांची लाखोली वाहिल्यानंतरही कुणावर कसलीच कारवाई होत नाही, हाच विचारस्वातंत्र्य अबाधित असल्याचा पुरावा होय. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. (Vishwaguru India) विचारभिन्नता हे जगातल्या सगळ्यात मोठ्या भारतीय लोकशाहीचे आगळेवेगळे वैशिष्ट्यही आहे. विचारशून्यतेपेक्षा विचारभिन्नता ही जास्त महत्त्वाची आहे. कारण, त्यामुळे लोकशाहीत जिवंतपणा येतो, तो प्रसंगी जाणवतोही. मतभेद असण्यात गैर नाही. मनभेद व्हायला नकोत. ते सामाजिक सौहार्दाला तडा देऊन जातात. त्यामुळे विचारभिन्नता, मतभेद याचे नेहमी स्वागतच व्हायला हवे. पण, दुर्दैवाने आपल्या देशात सध्या जे वातावरण निर्माण करण्यात आले आहे, त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आल्यासारखे दिसते आहे. विचारधारांचा संघर्ष पाहायला मिळतो आहे. तो एका विचारधारेने जाणीवपूर्वक निर्माण केला आहे. विचारधारांमध्ये संघर्ष आपल्यासाठी नवीन नाही. पण, या संघर्षातून जर वैमनस्य आणि उन्माद पसरणार असेल तर तो या विशालकाय देशातील अंतर्गत व्यवस्थेला मोठा धोका मानला पाहिजे. इकडे महाराष्ट्रातही सध्या पुरस्कार वापसी करणार्‍या लोकांनी तिरस्काराचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालविला आहे. एका नक्षल समर्थकाने लिहिलेल्या इंग‘जी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला देण्यात आलेला पुरस्कार सरकारने मागे घेतला म्हणून जो गदारोळ सध्या सुरू आहे, तो प्रायोजित आहे, हेही स्पष्ट आहे.

एकीकडे भाजपा, संघ यांना संविधानाचे धडे देण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे संवैधानिक मार्गाने निवडून आलेले मोदी सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करायचा, हा विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा आता जनतेच्या लक्षात आला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा आणि नंतर केरळ आणि त्रिपुरा …