---Advertisement---

हृदयद्रावक ! संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पहिले अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

by team
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांकडून कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो जोडले गेले होते. त्यानंतर ते फोटो माध्यमांमध्ये आले. हे फोटो पाहून केज तालुक्यातील जानेगाव येथील 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या आरोप पत्रातून समोर आलेल्या फोटोज नंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी आरोपींनी काढलेले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो देखील आहेत.

हे सगळे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. केज शहरात तरुणांनी आक्रमक होत बाजारपेठ बंद केली . काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदविला . केज मधील या बंदमध्ये अशोक शिंदे याने सहभाग नोंदवला होता. घरी आल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक शिंदे याने आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात राहणारी बहीण अश्विनी माने हिला फोन करून हळहळ व्यक्त केली होती. मला टोकाचा पाऊल उचलावासे वाटत आहे, असे त्याने फोनवर सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

जानेगाव येथील रहिवासी अशोक शिंदे याने हे फोटो पाहिल्यानंतर तो मानसिक तणावात होता . घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून प्रचंड अस्वस्थ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. अखेर या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आत्महत्येचे नेमके कारण काय होते, त्यामागे आणखी काही गोष्टी आहेत का, याचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेने तरुणाच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment