---Advertisement---

मित्रांनो, प्रेम करू नका, भावनिक व्हिडीओ पोस्ट करत 21 वर्षीय तरुणाने केली आयुष्याची अखेर…

---Advertisement---

जळगाव : प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अमळनेर शहरातील डुबक्या मारोती रस्त्यालगत घडली. गौरव बोरसे (२१, गांधली) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी ”मित्रांनो, प्रेम करू नका”, असे इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत आपले मनोगत व्यक्त केले होते.

अमळनेर शहरातील डुबक्या मारोती रस्त्यालगत मृत तरुण वास्तव्याला होता. त्याने आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत आपले मनोगत व्यक्त केले होते. आई, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, माझे वडील माझ्यावर खर्च करायला नकार देत होते. बाप्याला शिकव, पण मित्रांनो, प्रेम करू नका, असे त्याने टिटले होते

ती मला विसरली, पण…

मी एका मुलीवर प्रेम केले होते. आम्ही अल्पवयीन असताना लग्नही केले होते. मात्र आता तिने मला नाकारले आहे. ती विसरली, पण माझे प्रेम खरं होतं. असे त्याने इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत आपले मनोगत व्यक्त केले होते. अमळनेर शहरातील क्रीडा संकुलाशेजारील रस्त्यालगत असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, मिलिंद बोरसे गांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली व पंचनामा केला.

शेतकऱ्याने घेतला गळफास

पारोळा : शहरातील देवी पद्मावती नगरमध्ये राहत असलेल्या ४२ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दशरथ महाडिक (४२, देवी पद्मावती नगर) हे दुसऱ्याची शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. नापिकीमुळे ते नेहमी नैराश्यात राहत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---