---Advertisement---

Yogi Adityanath Threat: योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणीला अटक

by team
---Advertisement---

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा बाबा सिद्दीकींसारखी परिस्थिती त्यांना भोगावी लागेल’, अशी धमकी मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर देण्यात आली होती. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी काही तासातच एका तरुणीला अटक केली आहे.

योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारी महिला ही उल्हासनगर, ठाणे येथील रहिवासी असून तिचे नाव फातिमा असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फातिमा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची ओळख पटली असून तिचे नाव फातिमा खान असल्याचे समोर आले आहे. “फतिमा खानने उच्च शिक्षण घेतले आहे, मात्र ती सध्या मानसिक आजाराने त्रस्त आहे. आरोपी महिलेने आयटीमध्ये बीएस्सी पदवी मिळवली असून ती मुंबईजवळ ठाण्यात कुटुंबासह राहते.” चौकशी केल्यानंतर तिला नोटीस देण्यात आली आहे. आता महिलेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी मानसिक तपासणीही केली जाणार आहे.

फातिमाने मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवला होता. ज्यामध्ये योगी आदियानाथ यांनी १० दिवसांत राजीनामा दिला नाही तर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे त्यांची हत्या केली जाईल, असे लिहिले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment