जळगाव : पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असताना प्रमोद धनराज सोनवणे (३७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत गळफास घेत आत्महत्या केली. २१ जून रोजी ही घटना घडली. पत्नी घरी आल्यावर तिने दरवाजा उघडताच हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांनी मागील दरवाजाने घरात जाऊन आतून कडी लावली व गळफास घेतला.
पत्नी परतल्यानंतर तिने शेजारच्यांकडून चावी घेत दरवाजा उघडला असता, पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. प्रमोद यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रमोद सोनवणे यांनी गळफास घेण्यापूर्वी समोर स्वतःचा मोबाइल ठेवून त्यात चित्रीकरण सुरू केले. दोरी गळ्यात अडकविण्यापासून ते गळफास घेऊन लोंबकळण्यापर्यंत सर्वकाही चित्रित झाले आहे.