भुसावळ : वरणगाव फ़ॅक्टरीतील शिव मंदिराजवळील तलावात तरुणाचा बुडून अंत झाला. हि दुर्घटना मंगळवार, १३ रोजी उघडकीस आली. दीपक विलास तायडे असे मयताचे नाव आहे. याबाबत वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वरणगाव फॅक्टरीला लागून असलेल्या दर्यापूर शिवारातील सुशील नगर येथील रहिवासी विलास तुकाराम तायडे यांचा दीपक हा मुलगा होता. तो रविवार ११ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता. वडील विलास तायडे यांनी वरणगाव पोलिसात हलविल्याची नोंद केली होती. परंतु, या तरुणाचा शोध सुरू असताना १३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दीपकचा आयुध निर्माणी वरणगाव वसाहतीत असलेल्या शिव मंदिराच्या काही अंतरावरील तलावात आढळून आला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकु, आजी, आजोबा असा परिवार आहे.