---Advertisement---

इंजिनिअरचं स्वप्न अधुरं; धबधब्यात पोहण्यासाठी गेला अन् परातलाच नाही, तरुणासोबत नेमकं काय घडलं ?

---Advertisement---

नंदुरबार : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध वाल्हेरी धबधब्यातील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळोदा पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

दिगंबर प्रदीपभाई मराठे (वय २०, मूळ गाव कुकरमुंडा, सध्या रा. वेलदा) असे मृत युवकाचे नाव आहे. दिगंबर हा शैक्षणिक फॉर्म भरण्यासाठी कुकरमुंडा येथे गेला होता. काम न झाल्याने त्याने घरी न सांगता तो परस्पर चुलतभाऊ अभिषेक मराठे व जय अहिर यांच्यासोबत वाल्हेरी धबधब्यावर फिरायला गेला. दरम्यान, तिघे धबधब्यावर पोहोचले. यावेळी दिगंबर खोल पाण्यात गेला आणि नजरेआड झाला. मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो आढळला नाही.

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

पोलिस निरीक्षक धर्मेंद्र पवार, ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील व नातेवाईकांनी रात्रीच्या अंधारात शोध मोहीम राबवली. बॅटरीच्या सहाय्याने शोध घेतला गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. स्थानिक तरुणांनी धबधब्याच्या खोलपात्रात शोध घेतल्यानंतर दिगंबरचा मृतदेह आढळला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. कुकरमुंडा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इंजिनिअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या होतकरू तरुणाच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

पर्यटकांची असते गर्दी

तळोदा तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधबा महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात असून मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील पर्यटक देखील पावसाळ्यात मोठी गर्दी करतात. या ठिकाणी असणाऱ्या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी कोणती उपाययोजना किंवा कोणती यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित राहत नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment