तरुण भारत लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२२ । यावल तालुक्यातील चुंचाळे येथील तरुणाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक मधुकर धनगर (35) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सूत्रानुसार, तालुक्यातील चुंचाळे गावातील तरुण अशोक हा गाव विहिरीजवळून जात असताना त्याचा अचानक पाय घसरून विहिरीत पडला. खोल पाण्यात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरीकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला.
याप्रकरणी यावल पोलिसात रमेश पितांबर धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.