---Advertisement---

दुर्दैवी! वर्षभरापूर्वीचं लागली नोकरी अन् काळाने केला घात

by team
---Advertisement---

जळगाव : नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीला झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नशिराबाद उड्डाणपुलाजवळ दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. चैतन्य सुपडू फेगडे (रा. निंभोरा, ता. रावेर) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला आहे. चैतन्य व चेतन हे दोघं भाऊ कामानिमित्त दुचाकीने जळगावला येत होते. वडील रिक्षाने पुढे निघाले, तर दोन्ही भाऊ दुचाकी (क्र. MH 19 EE 1702) घेऊन निघाले होते. नशिराबाद गावाजवळील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. या अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला. तर चेतन हा गंभीर जखमी झाला.

गंभीर जखमी चेतनला तातडीने जळगाव शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत चैतन्य एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागला होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment