निवडणुकीच्या फडात तरुणाई भरकटतेय…

---Advertisement---

 

सुरेश तांबे

पाचोरा : राजकीय फडात तरुणाई भरकटली: ओत्या पाठ्र्यांच्या नावाखाली तरुणांचा व विद्यार्थ्यांचा वापर वाढला असून ही तरुणाईच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी धोक्याची घंटा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने जोर धरला असताना मताधिक्य मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते मंडळींकडून वेगवेगळ्या युक्त्या राबवल्या जात आहेत. मात्र या स्पर्धेत तरुणाई भरकटत चालत्याची गंभीर चिंताजनक स्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येते. कारण निवडणूक प्रचाराला रसद पुरवण्यासाठी काही ठिकाणी कार्यकर्त्यांना खुश करण्याच्या नावाखाली ओल्या पाठ्ा आयोजित केल्या जात असल्याचे चित्र समोर येत आहेत. या पाठ्यर्धांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी तरुण आणि अगदी मतदानाचा अधिकार न मिळालेली अल्पवयीन मुलेदेखील ओढली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

नेत्यांच्या मागे धावणाऱ्या या तरुणाईला निवडणूक संपल्यानंतर काहीतरी लाभ होईल या अपेक्षेने वापरून घेतले जात असल्याचेही निरीक्षकांचे मत आहे. नेत्यांना खांद्यावर बसवून विजयाची सतरंजी उचलणारी हीच तरुणाई, त्यांचे भविष्य कुठे जात आहे याचा विचार न करता, नाचत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे दृश्य पाहून ‘ह्या निवडणुका नाहीत, तरुणांचा अधोगतीकडे टोलवाटा करणारा खेळ सुरू आहे,’ अशी टीका सुज्ञ नागरिक करत आहेत.

ओल्या पाट्याच्या निमित्ताने प्रथमच दारूचा घोट घेणारे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी ही भावी पिढी सर्वात मोठी बळी ठरत असल्याचे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे.

रेल्वे अपघाताच्या सुरुवातीला जसे फक्त पहिले चाक जबाबदार असते, त्यानंतर येणारी चाके फक्त कारण ठरतात, त्याचप्रमाणे तरुणाईला चुकीच्या मार्गावर ढकलणाऱ्या या पार्टीच्या मागे कुणाचे हात आहेत, यावर खोलवर विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत असून या परिस्थितीवर लगाम आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व तरुण पिढीला अधःपतनापासून वाचवावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तके, परीक्षा फॉर्म आणि नोकरीसाठी कागदपत्रांची फाईल असायला हवी, त्या वयात हीच मुले झेंडे, फटाक्याचे दांडे आणि राजकीय पक्षांची चिन्हे हातात घेऊन रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. करिअर, शिक्षण आणि भविष्य घडणीकडे दुर्लक्ष करून ही तरुणाई राजकीय फडात वेगाने ओढली जात असल्याचे वास्तव सर्वांनाच चिंतेत टाकणारे आहे.

पूर्वी मुलगा, मुलगी शिक्षणात किती पुढे आहेत, कोणते पदवीधर आहेत हे अभिमानाने लग्नपत्रिकांवर छापले जायचे. परंतु कालांतराने हा ट्रेंड बदलत चालला असून, आता अनेक लग्नपत्रिकांमध्ये अमुकचा अध्यक्ष, तमुकचा उपाध्यक्ष, फलाण्या नेत्याचा निकटवर्तीय अशा राजकीय उपाध्यांनी भरलेल्या ओळी दिसून येतात. शिक्षणापेक्षा राजकीय चमचा सत्ताधारी पदांना अधिक महत्त्व देण्याची ही प्रवृत्ती समाजात कशी रुजली, याबद्दल जाणकारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

वाढते राजकीय आकर्षण आणि मिळणारा तात्पुरता फायदा यामुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गावर चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वयात शैक्षणिक प्रगती व करिअर घडवणे अत्यंत गरजेचे असताना, झेंडे आणि दांडे घेऊन फिरणारे तरुण पाहून अनेक पालकांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.

कारण दिशाहीन होत चाललेल्या या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन, नियंत्रण आणि सकारात्मक पर्याय देणे हीच काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---