Dhule Crime News : धारदार शस्त्राने भोसकून तरुणाला संपवलं; तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : शहरातील मिल परिसरातील ध्वज चौकात सोमवारी (ता. २०) दुपारी १ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाने गंभीर वळण घेतले. या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. या घटनेनंतर तीन संशयित पसार झाले असून, पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मयत तरुणाचे नाव गौरव किरण माने (वय २७) असे असून, संशयितांपैकी पानटपरीचालक जयेश पाकळे (वय १९) याने धारदार शस्त्राने भोसकून हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेत आणखी दोन संशयितांचा समावेश असून, तिघेही घटनेनंतर फरार झाले आहेत.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

ध्वज चौक परिसरात गौरव माने आणि जयेश पाकळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर जयेशने शेजारील दोन साथीदारांसोबत मिळून गौरववर हल्ला केला. जयेशने धारदार शस्त्राने गौरवला वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात वादाचे कारण स्पष्ट झाले नसले तरी किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले आहे.

तिघे संशयित फरार

घटनेनंतर आरोपी जयेश पाकळे आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. सध्या धुळे शहर पोलीस आरोपींच्या शोधात असून, त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात तणावाचे वातावरण

या हत्येमुळे मिल परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस तपास सुरू

धुळे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिघेही आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.