---Advertisement---

जि. प. शाळेतील 14 शिक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

---Advertisement---

पाचोरा : विनोबा अँपच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील 14 जि. प. शाळेतील शिक्षकांचा गौरव सोहळा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात उत्साहात पार पडला. जिल्हा शिक्षणाधिकारी सचिन परदेशी व उप शिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी व जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली.

‘विनोबा – शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’ अंतर्गत Open Links Foundation मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनोबा जळगाव टिमचे जिल्हा समन्वयक सचिन ससाणे, संदीप साबळे आणि हितेश भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी “विनोबा कार्यक्रम केवळ एक डिजिटल उपक्रम नसून, तो शिक्षकांच्या कार्यास दिशा व बळ देणारा प्रभावी मंच आहे” असे सांगत शिक्षकांचे मनोगत ऐकून घेतले. या चर्चेमुळे शिक्षकांमध्ये आत्मविश्वास व कार्याविषयी नवी प्रेरणा जागृत झाली.

---Advertisement---

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे, तर शिक्षणातील चांगल्या उपक्रमांची मांडणी, नव्या कल्पना व अनुभवांचे आदानप्रदान यासाठी व्यासपीठ मिळाले. अनेक शिक्षकांनी आपले अनुभव सांगताना आपल्या कामामागची तळमळ व सामाजिक भान उलगडून दाखवले. या उपक्रमाने शिक्षकांच्या कार्यास नवी दिशा देणारी ऊर्जा मिळवून दिली, अशी प्रतिक्रिया सहभागी शिक्षकांनी दिली.

या शिक्षकांचा झाला सन्मान

प्रतिभा तगड, योगिता बडगुजर, राहुल पाटील,शहनाज पटेल,रंजना पाटील, क्रांती वाघ,अनिता शिनगारे, उज्वला खैरनार, निशा पाटील, सुप्रिया जाधव, राजेंद्र गोसावी,वैशाली पाटील, योगिता लोखंडे, उमा वानखेडे यांचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---