जि. प. शाळेत पालकमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल रूमचे लोकार्पण !

धरणगाव :  गावकऱ्यांची साथ व व शिक्षकांची मेहनत असेल तर शाळेसह गावाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान शाळेच्या सर्वांगीण विकासाठी वरदान ठरत आहे.  शाळा हे ज्ञान मंदिर असून ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांच्या  शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळांना सुविधांची कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन   पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील भोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे लोकार्पण स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनीनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व शाळे मार्फत शाल श्रीफळ व बुके देवून करण्यात आला.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियाना अंतर्गत धरणगाव तालुक्यातील भोणे येथील जिल्हा परिषद शाळेला द्वितीय क्रमांकाचे २ लाखाचे  बक्षीस मिळाले होते. बक्षिसाच्या रकमेतून शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळेला डिजिटल रूम व भोजन कक्ष तयार केले. तसेच बाला या उपक्रमा अंतर्गत व लोकसहभागातून शाळेला रंगरंगोटी करून परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविल्याने  शाळेचे रुपडे पालटले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी केले तर आभार सरपंच संगीता पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थितीती 

यावेळी तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, मोतीअप्पा पाटील, सरपंच संगीता पाटील,  उपसरपंच भालचंद्र पाटील, शालेय समिती अध्यक्ष गजानन फुलपगार, सदस्य जागृती पाटील, आरती भोई, प्रवीण शिंदे, यशवंत पाटील,  ग्रा. पं. सदस्य निंबा पवार , मकरध्वज पवार, योगेश पाटील, शेतकरी संघटनेचे रावसाहेब पाटील, विभाग प्रमुख समाधान पाटील, दिनेश पाटील, शाखाप्रमुख भूषण पाटील, अशोक पाटील, अमोल पाटील, हरीश पाटील, दीपक पाटील,  मुख्याध्यापक दिलीप कुंभार, उपशिक्षक लक्ष्मण पाटील रोटवदचे माजी सरपंच मोहन शिंदे,  यांच्यासह ग्रामस्थ पालक व शिक्षणप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदर्श शिक्षक कुंभार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
यावेळी जिल्हा परिषदचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दिलीप कुंभार यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शाळेत सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून मुख्याध्यापक, उपशिक्षक व ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी मुले व मुलीनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला असता विचारलेल्या प्रश्नांची तत्काळ उत्तरांनी पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.