जळगाव: सध्या जागतिक घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, अक्षय तृतीया सण दोन दिवसांवर आली असताना सोने आणि चांदीचा भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या सणावर खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरते की काय असे ग्राहकांना वाटू लागले आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच ७२ हजारांच्या आत आलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी ३५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ७१ हजार ९५० रुपयांवरून ७२ हजार ३०० रुपये प्रतितोळा झाले. सोने-चांदी खरेदीचा अक्षय मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया सण शुक्रवार, १० मे रोजी असून त्यापूर्वीच सोने-चांदी वधारत आहे.