---Advertisement---

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार ; पारोळा नजीक घटना

---Advertisement---

पारोळा । राज्यासह जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यातच अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पारोळा शहराजवळ घडली. संदीप ऊर्फ आबा शालीग्राम पाटील (वय ३६) असं मृताचे नाव असून याघटनेबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे चौफुलीजवळ सांगवी येथील रहिवासी संदीप ऊर्फ आबा शालीग्राम पाटील (वय ३६) हे सांगवीकडून दुचाकीने पारोळ्याकडे येत होते. पारोळा शहर काही अनंतराव असताना महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. याबाबत घटनेची माहिती ज्ञानेश्वर रामोशी यांनी फोनद्वारे दिल्याने घटनास्थळी सांगवी येथील प्रवीण पाटील, भास्कर देवरे, नथ्थू पाटील व ग्रामस्थ दाखल झाले. यावेळी जखमी अवस्थेतील संदीप पाटील यास उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले.

संदीप पाटील यास रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहचल्यानांत डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेबाबत पारोळा पोलिसात जामसिंग पाटील (रा. सांगवी) फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नाना पवार तपास करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment