अतिवृष्टीसह पुराचा फटका; १७ सेप्टेंबरपर्यंत १७६ गावे बाधित

तरुण भारत लाईव्ह । २४ सप्टेंबर २०२३। सप्टेंबर महिन्यातील आठ दिवसात अतिवृष्टीसह पुरामुळे १७६ गावे बाधित झाली आहे. या गावातील ३९१० शेतकऱ्यांना फटका बसला असताना गेल्या चार दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे आणखीन हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे त्यामुळे पंचनाम्यानंतरच बाधित शेतकऱ्यांचा आकडा निश्चित होणार आहे.

दिनांक २२ सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला आहे. सप्टेंबर महिन्यात दिनांक ८,९,१५,१६,१७ या पाच दिवसात तब्बल १७६ गावांना अतिवृष्टी पुराचा फटका बसला आहे. त्यानंतर दिनांक १८ ते २२ दरम्यान जामनेर, पारोळा, एरंडोल, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर, या तालुक्यांना पुरासह अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या चार दिवसां सुमारे १००० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक फटका केळी आणि कापसाला बसला आहे. १०२९३  हेक्टर क्षेत्रातील केळी आणि १३५ हेक्टर कापसाचे नुकसान झाले आहे. रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, तालुक्यात केळीचे सर्वाधिक तर रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, व जळगाव, तालुक्यात सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले आहे. अतिवृष्टी पूर आणि वादळामुळे चोपडा तालुक्यातील ९० हेक्टर क्षेत्रावरच्या भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. अन्य कुठलाही तालुक्यात भाजीपालाचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.