यावल: कोळन्हावी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी एका वाहनाचा अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनात गोवंश असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनातून सहा गोवंश हस्तगत केले. याप्रकरणी संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंश मनवेलच्या गोशाळेत पाठवण्यात आले आहे. गोवंश तस्करी पुन्हा ऐरणीवर यावल-चोपडा रस्त्यावर धानोरा गावाजवळ कोळन्हावी फाटा आहे.
या फाट्याजवळ बोलेरो मालवाहू वाहन या वाहनाचा मंगळवारी दुपारी अपघात झाला व त्यातून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांनी यावल पोलिसांना दिली. यावल पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व तेथून त्यांनी सहा गोवंश ताब्यात घेतले. व या प्रकरणी महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन वरील अज्ञात चालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार भरत कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.
तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे. गोवंश मनवेल गोशाळेत खाना बोलेरो वाहनातून मिळालेले सहा गोवंश हस्तगत करण्यात आले व हे गोवंश पालन पोषणाच्या दृष्टिकोनातून मनवेल येथील श्री देवानंदजी गोशाळेत पाठवण्यात आले. गो शाळेकडून वाहन घेऊन गोशाळेचे अध्यक्ष गोकुळ संतोष कोळी हे आले होते व त्यांनी सुरक्षित गोशाळेत हे सर्व गोवंश नेले आहे व त्यांचे पालन पोषण ते करणार आहे.