Crime News: अमळनेर तालुक्यात सोलर केबल चोरी, धुळ्यातील ५ संशयीत पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : अमळनेर तालुक्यातील वावडे येथे सोलर केबल चोरी प्रकरण उघड झाली होते. याप्रकरणी पाच संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. या सर्व  संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वावडे गावात सोलर प्लांट आहे. या प्लांटमधील सोलर केबलची चोरी झाली होती.  याबाबत मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार गठीत पथकाचे नेतृत्त्व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांनी केले. त्यांच्या  नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण केले. या विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. पथकाद्वारे कारवाई करत संशयित गोकुळ हिरामण कोरडकर (वय २५), भावडू जानकु थोरात (वय २४), जिभाउ वामन थोरात (वय २८), गोकुळ राजेंद्र भामरे (वय २४) आणि राकेश धनराज पाटील (वय २४) यांना ताब्यात घेण्यात आले.

पथकाने केलेल्या चौकशीत संशयितांनी सोलर प्लांटमधील केबल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या साथीदारांपैकी पाच आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  ही कारवाई पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, गोरख बागुल, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, दिपक चौधरी, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

न्यायालयाने पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास मारवाड पोलीस ठाण्याद्वारे सुरू आहे.