अमळनेर : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात २ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी वितरित झाला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. मंत्री अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने ही कामे मंजूर झार्ली मतदारसंघात ९ गावात ही विकासकामे होणार आहे. यात समाजमंदिर, पाणीपुरवठा आरओ प्रणाली, सोलर पथदिवे, रस्ता काँक्रीटीकरण, गटार बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास कल्याण विभागाचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश २२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाले आहेत.
या गावांमध्ये होणार विकासकामे
या विभागांतर्गत ढेकू खुर्द येथे समाज मंदिर बांधकाम करणे १५ लक्ष, पाणीपुरवठा आरओ प्रणाली बसविणे ७.५० लक्ष, रामेश्वर खुर्द येथे सम ाजमंदिर बांधकाम करणे १५ लक्ष, सोलर पथदिवे बसविणे १० लक्ष, समाजमंदिर बांधकाम करणे १५ लक्ष, सारबेटे खुर्द येथे समाजमंदिर बांधकाम करणे १५ लक्ष, लोणचारम येथे समाज मंदिर बांधकाम करणे १५ लक्ष, पाणीपुरवठा आरओ प्रणाली विकसित करणे ७.२६ लक्ष, रणाईचे तांडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, समाजमंदिर बांधकाम करणे १० लक्ष तसेच अमळनेर मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील चिखलोद खुर्द येथे समाज मंदिर बांधकाम करणे १० लक्ष, पाणीपुरवठा आरओ प्रणाली बसविणे ५ लक्ष, पिंपळकोठा येथे सोलर पथदिवे बसविणे १० लक्ष, रस्ता काँक्रीटीकरण करणे १५ लक्ष, वसंतनगर तांडा येथे गटार बांधकाम करणे १० लक्ष, रस्ता काँक्रीटीकरण करणे १५ लक्ष, हिवरखेडा तांडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे असे एकूण १ कोटी ९४ लक्ष ७६ हजारांची विकासकामे होणार आहेत.या विकास कामांच्या मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, नाअजित पवार, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.