अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात ३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. यात असंख्य शिव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वर्णेश्वर मंदिर संस्थानसाठी ५० लाख तर रणाईचेतील चक्रधर स्वामी मंदिरात भक्त निवासासाठी ४० लाख यासह एकूण १६ मंदिर संस्थानला निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. महाशिवरात्री महोत्सवानिमित्त ना.अनिल पाटील हे वर्णेश्वर मंदिरावर गेले असता शिवभक्तांना त्यांनी मंदिर विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले होते तर रणाईचे येथे नुकत्याच झालेल्या खिचपुरी महोत्सवात देखील त्यांनी भक्तांच्या निवाऱ्यासाठी भक्तनिवास करण्याची घोषणा केली होती.
त्या गोष्टीला १५ दिवस देखील उलटत नाही. तोच मंजुरी आणून त्यांनी शब्द खरा करून दाखविल्याने भक्त परिवाराने आनंद व्यक्त केला आहे. या विकासकामांना मिळाला निधी मौजे पाडसे, ता. अमळनेर येथील भवानी माता मंदिर चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे १० लाख, मौजे झाडी, ता. अमळनेर येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे ३० लाख, मौजे दळवेल, ता. पारोळा येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे २५ लाख, शहरातील वर्णेश्वर महादेव मंदिर पर्यटनदृष्ट्या विकसीत करणे व इतर अनुषंगिक कामे करणे ५० लाख, मौजे अंचलवाडी, ता. अमळनेर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे
२५ लाख, मौजे बोदडे, ता. अमळनेर येथील शनि करणे व इतर अनुषंगिक कामे करणे ५ लाख, मौजे गलवाडे, ता. अमळनेर येथील म्हाळसादेवी मंदीर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणे – १० लाख, मौजे निभोरा, ता. अमळनेर येथील राममंदीर येथे सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे १० लाख, मौजे मठगव्हाण, ता. अमळनेर येथील विठ्ठमंदीर येथे संरक्षण भिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे १५ लक्ष, मौजे पिंपळे, ता. अमळनेर येथील नवनाथ व दत्तमंदीर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे २० लाख, मौजे आटाळे, ता. अमळनेर येथील भवानी मंदीर येथे चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे ५ लाख, मौजे कावपिंप्री, ता. अमळनेर येथील लहरोबावा सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे १५ लाख, मौजे तरवाडे, ता. अमळनेर येथील धनदाई माता येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर
अनुषंगिक कामे करणे १० लाख, मौजे जवखेडा, ता. अमळनेर येथील दत्त महाराज मंदिर येथे डोम सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे २० लाख, चक्रधर स्वामी महाराज मंदिर रणाईचे ता. अमळनेर येथे भक्तनिवास बांधकाम करणे व इतर अनुषंगिक बांधकाम करणे ४० लाख, मौजे ढेकू अंबासण ता. अमळनेर येथील श्रीराम मंदिर येथे चौक सुशाभीकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे १० लाख असे एकूण ३ कोर्टीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या विकास कामांच्या मंजुरीबद्दल ना. अनिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.