जळगाव: आता पर्यंत तुम्ही ऐकलं असेल की प्रेमामध्ये मुलगा मुलीला पळून नेतो पण जळगाव शहरात काहीतरी वेगळंच चित्र पाहिला मिळालं या प्रकरणात चक्क एक मुलीनेच एका मुलीला पळून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रामानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, ही घटना ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणीने सोबत घेत किराणा दुकानावर जाऊन येतो, असे सांगून सोबत नेले; परंतु ती घरी न परतल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरून पळवून नेणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करत आहेत.