अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत केला विनयभंग, गुन्हा दाखल

धरणगाव:  महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना या वाढत आहेत. अश्यातच एक विनयभंगाची बातमी समोर आली आहे, ही घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी घडल्याचे समोर आले आहे धरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लग्न करण्यासाठी पळून जाण्याची मागणी करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,धरणगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. १७ मार्च २०२२ पासून याच परिसरात राहणारा प्रविण जगतराव पाटील याने पिडीत मुलीला पाठलाग करून तिला लग्न करण्यासाठी माझ्यासोबत पळून जावू असे सांगितले. त्यानंतर पिडीत मुलीने याला नकार दिल्यावर तिला बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी प्रविण पाटील हा पिडीत मुलीच्या घरासमोर येवून बोलण्यासाठी जबरदस्ती करत असतांना तिचा हात पकडून विनयभंग केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता संशयित आरोपी प्रविण पाटील याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.