जळगाव : शहरातील शिव कॉलनी परिसरात फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी दहाला घडली. दरम्यान, याच आगीने शेजारील हॉटेल व कार दुरुस्तीच्या दुकानांनाही वेढले तब्बल साडेतीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अनीशमन दलास आग विझविण्यात यश आले. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात पेत आहे.अर्जुनप्रसाद शर्मा हे चंदूअण्णानगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे शिवकॉलनी परिसरात महामार्गावर बिल्स फर्निचर नावाचे दुकान आहे. ते जुने तसेब नवे सागवान लाकूड घेवून फर्निचर ऑर्डरनुसार बनवून विक्री करतात, फर्निचरला लागून एका बाजूला मिस्टर बावर्ची फॅमिली हॉटेल आहे. तर दुसन्या बाजुला सिध्दी ऑटो व्हील कार दुरुस्तीचे दुकान आहे.
फर्निचर दुकानात आगीचे तांडव फर्निचरच्या मागच्या बाजूने लाकडाने पेट घेतला. हळूहळू, फर्निचर, प्लायूड शीट पेटले आणि आगीचे लोळ उठले. सकाळी मनपाच्या अग्नीशमनाला मिळाल्यानंतर ७.३० वाजता अग्नीबंबाच्या चार गाड्या घटनास्थळी खाना झाल्या. कर्मचान्यांनी पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली तोवर आजुबाजुचे दुकानही आगीच्या विळख्यात आले. फर्निचरच्या दुकानात लाकडाचे तयार केलेले दहा कॉट शनिवारी हार्डवेअरच्या दुकानातून आणलेले नवे दहा प्लायूड शीट जळून खाक झाले. जुने तसेच नवे सागवानी असे १४ ते १५ टनाचे लाकूड व्हील फर्निचर मशीन, कटर, डील राऊटर, झिकझिक मशीन, इलेक्ट्रीक मशीन आगीत सिध्दी ऑटोचे नुकसान वित्स फर्निचरला लागून असलेल्या सिध्दी ऑटो व्हीलच्या दुकानही आगीच्या चपाट्यात आले. याठिकाणी कार वॉसिंग, कोटींग, अलायमेंट बॅलेसिंग मशी, ऑटो अॅडव्हान्स मशिनरी इत्यादी होते. तसेच स्पेअर पार्ट, आईल तसेच साहित्य होते.
याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मशिनरीचे अधिक नुकसान इाले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनीकडून सांगण्यात आले. हॉटेलममध्ये पाणी सिस्टीम खाक फर्निचरच्या दुकानाला लागून बावर्ची इंटिलचा स्टॉपरुम आहे. या रुमला आग लागल्याने याठिकाणी असलेली पाण्याची सिस्टीमप्रणाली खाक झाली, येथील फर्निचर, खुर्चा, टेबल इत्यादी आगीत जळाल्याने हॉटेलचे नुकसान झाले हॉटेलचे संचालक किरण परदेशी यांनी सांगितले की, फर्निचर दुकानाला आग लागल्यानंतर ती झपाट्याने पसरली. पात हॉटेल तसेच सिध्दी ऑटो व्हील या दुकानाचे नुकसान झाले. आग कशामुळे लागली हे समजू शकले. नसल्याचे त्यांनी सांगितले. घटना कळताच रामानंदनगर पोलीस ठाणे पोलिसांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. तीनही फर्मची पाहणी केली तसेच माहिती जाणून घेतली. आग लागल्यानंतर तत्काळ अग्नीशमन विभागाला खबर प्राप्त झाली असती तर आगीचा आगडोंबाची तीव्रता कमी होवून काही प्रमाणात नुकसान रोखता आले असते, असाही सूर व्यक्त झाला.
अग्निशमन पथकाचे शर्थीचे प्रयत्न
अग्रिशमन विभागाचे घटनास्थळी चार बंब खाना झाले. आग विझविताना रिकामे झालेले दोन बंब पुन्हा पाण्याने भरुन आग विझविण्याकामी पुन्हा त्याचा वापर केला. साडेतीन तासांच्या प्रयत्नागंती ही आग विझविण्यात पयकाला यश मिळाले, पथकाने हॉटेलमध्ये पाण्याचा फवारा मास्त गॅस सिलेंडर सुरक्षितरित्या बाहेर काढले. अग्रिशमन विभागाचे अधिक्षक शशीकांत बारी यांच्या मार्गदर्शनात सुनिल मोरे, अश्विजित घारडे, गंगाधर कोळी, संजय तायडे, चेतन सपकाळे, नितीन ससाणे, तेजस जोशी, जगदीश साळुंखे, सरदार पाटील, भगवान पाटील, हर्ष शिदे, मनोर तिखट, योगेश पाटील, इकबाल तडवी, वाहन चालक प्रभाकर, सोनवणे, प्रदीप धनगर, प्रकाश कुमावत, संतोष तायडे, देविदास सुरवाडे संजय भोईटे, भारत छापरिया या अनीशमन पथकातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.