मुंबई । यंदाचा उन्हाचा चांगलाच त्रासदायक ठरला. उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने आता प्रत्येक जण मान्सूनची चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत. अशातच मान्सुनच्या संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली. यंदा मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे.
गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु आहे. त्यानंतर ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. आता महाराष्ट्रात आठवडाभरात मान्सून येणार असल्याची शक्यता आहे.१ जूनही मान्सूनच्या आगमनाची तारीख असते, मात्र यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस ५ जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये १० जूनपर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, वेळेच्या आधीच मान्सूनची एन्ट्री झाल्याने बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच बंगालच्या उपसागरात मान्सून मजबुत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून लवकर बरसेल, असाही अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता कोकणात पाऊस बरसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.