जळगाव : १४८ वर्षाची परंपरा असलेल्या शहरातील पिंपराळा नगरीत आषाढी एकादशीनिमित्त रथ उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. सालाबादाप्रमाणे या वर्षीही हा रथउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जि .प. सदस्य प्रताप पाटील, अरविंद देशमुख वा अमर जैन आदी उपस्थित होते.
या रथ उत्सवाला ‘हरी नामाच्या गजरात’ दुपारी १२:३० वाजता सुरवात करण्यात आली. महिला भजनी मंडळासह पुरुष टाळकरी पावली खेडत हरी नामाच्या गजरात रथाच्या पुढे येत होती. रथच्या स्वागता साथी सकाळी पाऊसाने हजेरी लावल्याचे देखील पाहायला मिळाले. रथाच्या पुढे पालखी तसेच लेझीम पथक व एक लहान मुलांनी छोटा रथ देखील पहायला मिळाला.
रथ उत्सवाचे वैशिष्ट्य
१४८ वर्षाची परंपरा असलेला जळगावातील पिंपराळा नगरीचा श्रीराम रथ उत्सव असून, आषाढी एकादशीनिमित्त या रथ उत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रतिपंढरपूर म्हणून या उसत्वाची ओळख आहे. सालाबादाप्रमाणे या वर्षीही हा रथउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रथा मध्ये विठ्ठलाची मूर्ती नसून राधा कृष्णाची मूर्ती विराजमान असते.
प्रतिपंढरपूर म्हणून रथउत्सवाची ओळख
अनेक भाविक या रथोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी पिंपराला येथे एकत्र येत असतात. प्रतिपंढरपूर म्हणून या रथउत्सवाची ओळख असून जे लोक पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही ते या ठिकाणी या रथ उत्सवच दर्शन घेत असतात. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या तालावर नृत्य करत अनेक भाविक या उत्सवात सहभागी झाले. ट्रॅक्टरवरील विठ्ठला रखुमाईच्या प्रतिकात्मक मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोंगाचे आकर्षण
खान्देशात या उत्सवात भवानी मातेचे विविध रूप घेऊन नवस मागण्याची प्रथा आहे. तो नवस पूर्ण व्हावा यासाठी भवानी मातेचे विविध रूप घेतलेले सोंग हे भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी पारंपिरक पद्धतीने लेझीम देखील आयोजित केली जाते. एकंदरीतच संपूर्ण पिंपराळा नगरीत आनंदाचे, उत्साहाचे वातावरण येथे या ठिकाणी पाहायला मिळते.