‘उशिरापर्यंत बाहेर फिरणे चांगले नाही’, आई-वडिलांनी दिली समज अन् तरुण बेपत्ता

जळगाव : उशिरापर्यत बाहेर फिरणे चांगले नाही, अशी समज आई-वडिलांनी दिली. या रागात घराबाहेर पडलेला १८ वर्षीय तरुण बेपत्ता झाला; राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; तर शहरातील एका महाविद्यालयातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

रागाच्या भरात तरुण बेपत्ता
उशिरापर्यत बाहेर फिरणे चांगले नाही, अशा शब्दात आई-वडिलांनी समज दिली. या रागात घराबाहेर पडलेला १८ वर्षीय तरुण बेपत्ता झाला. रविवार, २२ रोजी रात्री ही घटना जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असता मुलाचा तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल मुकुंद्र पाटील हे करीत आहेत.

राहत्या घरातून मुलीला पळविले
राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले. बुधवार, ११ रोजी सकाळी ही घटना जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असता मुलीचा तपास लागला नाही. या प्रकरणी सोमवार, २३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्सटेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.

कॉलेजमधून तरुणी बेपत्ता
जळगाव शहरातील एका महाविद्यालयातून २१ वर्षीय तरुणी सोमवार, २३ रोजी सकाळी ११.१५ वाजता बेपत्ता झाली. तरुणीचा तपास न लागल्याने या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहेत.