---Advertisement---

काय ? पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता

by team
---Advertisement---

पुणे: २४ जानेवारीदेशभरात कडाक्याची थंडी जाणवत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवसात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे

सध्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी आहे. पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment