जळगाव : कार रस्त्याच्या कडेला लावून कुटुंबातील तिघे नाश्ता करण्यासाठी गेले. ही संधी हेरत तिघे कारजवळ आले. पुढचे टायर चाकूने फाडले. चैन स्नॅचिंग करण्याचा तिघांचा कट होता. मात्र 1 प्रकार लक्षात आल्याने गाडी मालक तत्काळ कारकडे गेले. दोन साथीदार पळाले. एका अल्पवयीनला पकडून त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जमा केले. मंगळवार २७ रोजी दुपारी शहराच्या नेहरु चौक पुतळाजवळ ही घटना घडली.
दुपारी एक वाजेच्या सुमारास कार क्रमांक एम.एच. १९ सी.व्ही.९३६२ या कारने एक दाम्पत्य तसेच त्यांचा मुलगा गावात आले. नेहरू पुतळ्याजवळ स्टेशनरोडच्या कडेला त्यांनी कार लावली. त्यानंतर र ते नाश्ता करण्यास गेले. ही संधी हेरत तीन संशयित आले. एकाने पुढच्या साईडचे टायर चाकूने फाडले. त्यामुळे हवा निघून टायर जागेवर बसले. हा प्रकार लक्षात आल्याने गाडी मालक हे कारकडे खाना झाले. त्यांनी टायर पाहताच एकाने त्यांच्या दिशेकडे चाकू दाखविला. गाडी मालक पुढे सरसावताच दोघे साथीदार पळाले. तर एकाला त्यांनी पकडले.
सोबत असलेल्या गृहीणीला हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांना फोन लावला. त्यानंतर या संशयिताला रिक्षात टाकले असता त्याने अंग टाकत बेशुध्द झाल्याचा आव आणला. त्याच अवस्थेत त्याला या कुटुंबियाने शहर पोलीस ठाण्यात रिक्षामधून आणले. सोल्युशनचा नशा ज्या संशयित मुलाला रिक्षातून आणले त्याने सोल्युशनचा नशा केल्याचे त्याठिकाणी बोलले गेले. गाडी मालकाच्या गळ्यात सोन्याचा गोफ होता.
तो पाहिल्यानंतर तो लांबवायचा असा तिघांचा प्लॅन होता. त्यानुसार त्यांनी कारचे टायर फाडले. टायर बदलविताना त्यांना ही चैन लांबवायची होती, असे त्याठिकाणी चर्चेतून समोर आले.दरम्यान या संशयिताचे दोन साथीदार कोण होते? हा संशयित कुठे राहतो. या अनुषंगाने माहिती घेवून प्रकार जाणून घेण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गृहणीने सांगितली आपबिती
पोलीस ठाण्यात गृहणीने सांगितले. मिस्टरांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना सलाईन लावली होती. नेहरु पुतळाजवळ नाश्ता करण्यासाठी थांबलो असता एकाने टायर काही तरी चाकूसारख्या शस्त्राने फाडले. त्याला रोखले असता त्याने ते उगारले. त्याला पकडून पोलिसांना फोन केले. त्यानंतर त्याला रिक्षात घेवून याठिकाणी आलो. हा भयंकर प्रकार असत्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले