Jalgaon Crime : ईद सणानिमित्त मेळावा लागला होता. याठिकाणी मद्यपान केलेल्या इसमाशी दोघे भांडत होते. हे भांडण सोडविण्यासाठी गेल्याचा राग येवून नंतर मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली. यात पाच जण जखमी झाले. गुरुवार, ११ रोजी ११ वाजेच्या सुमारास रजा कॉलनी शेरा चौक येथे ही घटना घडली. याप्रकरणी आसीम बाबु, उर्फ काल मुलतानी, इबु मुलतानी, तौसिफ मुलतानी यांच्यासह १५ अनोळखी इसमाविरुध्द शुक्रवार, १२ रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुरुवार, ११ रोजी रात्री ९.३० वाजता शेरा चौकात ईद सणानिमित्त मेळावा लागला होता. या मेळाव्यास दारु पिलेल्या एका इसमाशी तौसीफ मुलतानी व इबु मुलतानी भांडत होते. हे भांडण सोडविण्यासाठी अब्दुल हनीफ पटेल हे गेले. हे भांडण सोडविल्यानंतर अब्दुल पटेल हे घरी निघून आले. रात्री ११ वाजेच्या सुमारास आसीम बाबु, इबु मुलतानी, तौसिफ मुलतानी यांच्यासह १५ ते २० जण अब्दुल पटेल यांच्या घराकडे मोर्चा वळविला. घरात शिरताच तौसिफ मुलतानी याने अब्दुल पटेलयांना धमकाविले.
त्यानंतर संशयितांनी घरातील सामानाची तोडफोड केली. शिवीगाळ करत पटेल यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी पटेल यांच्या आई जैनबी पटेल, पत्नी निलोफर व मेहमुद पटेल असे आले असता त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीची तोडफोड केली. यात अब्दुल पटेल, त्यांचे भाऊ मेहमूद, यास्मीन मेहमुद पटेल, सईदा जाबीर पटेल, शाहिद लतीफ पटेल हे जखमी झाले. संशयिताविरुध्द गुन्हा दाखल झाला