कुणी प्राचार्य होता का ? जळगाव जिल्ह्यातील 57 महाविद्यालये प्राचार्यांविना !

डॉ. पंकज पाटील
जळगाव :
केंद्र शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्ष्ाणिक धोरण लागू केले आहे. त्याची अंमलबजावणी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फेत देशभरातील सर्व विद्यापीठात राबविण्यात येत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही या नवीन शैक्ष्ाणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या जळगाव जिल्ह्यातील 57 महाविद्यालयात प्राचार्यांचीच नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नवीन शैक्ष्ाणिक धोरण राबवणार कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच प्रशासकीय कामकाज करतानाही या महाविद्यालयांना अडचणी येत आहेत.

कला वाणिज्य व विज्ञान
जिल्ह्यात विविध विद्याशाखांची मिळून एकूण 92 महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची 53 महाविद्यालये विद्यापीठाशी सलंग्नीत आहेत. त्यापैकी केवळ 23 महाविद्यालयात पुर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 30 महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. ही पदे अजूनही रिक्तच आहेत.

ललित कला,विधी व समाजकार्य कॉलेज

जळगाव जिल्ह्यात ललित कला महाविद्यालय एकच असून येथेही प्राचार्यपद रिक्त आहे. तीन समाजकार्य महाविद्यालये असून चोपडा व जळगावच्या महाविद्यालयात प्राचार्यपद भरलेले आहे. मात्र अमळनेर येथील महाविद्यालयात प्राचार्यपद रिक्तच आहे. विधी महाविद्यालये दोन असून एका महाविद्यालयाचे प्राचार्यपद रिक्त आहे.

औषधनिर्माणशास्त्र
जळगाव जिल्ह्यात सहा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांपैकी पाच महाविद्यालयात प्राचार्य आहेत. पाळधी येथील महाविद्यालयात प्राचार्य पद रिक्तच आहे.

शिक्ष्ाणशास्त्र व शारीरिक शिक्ष्ाणशास्त्र महाविद्यालये
जिल्ह्यात 15 शिक्ष्ाणशास्त्र व शारीरिक शिक्ष्ाणशास्त्र महाविद्यालये आहेत. यापैकी केवळ तीनच महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य कार्यरत आहेत. उर्वरीत 12 महाविद्यालयांचा कारभार प्राचार्याविनाच चालत आहे.

विद्यापीठ परिसंस्था
विद्यापीठ परिक्ष्ोत्रातील मान्यताप्राप्त परिसंस्था आठ असून यात केवळ गोदावरी फाऊंडशेनचे गोदावरी इन्स्ट्यिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च या संस्थेत प्राचार्य कार्यरत आहेत. उर्वरीत सात संस्थांमध्ये प्राचार्यपद रिक्त आहेत.

चार अभियांत्रिकी महाविद्यालयेही त्ोही प्राचार्याविनाच
जळगाव जिल्ह्यात चार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या चारही महाविद्यालयातील प्राचार्यपद रिक्तच आहेत.

विद्यापीठाच्ो प्रताप तत्वज्ञान केंद्रही संचालकाविनाच
विद्यापीठातर्फे अमळनेर येथे प्रताप तत्वज्ञान केंद्र चालविण्यात येत आहे. मात्र येथेही संचालकपद भरण्यात आलेले नाही.

कसे राबवणार नवे शैक्ष्ाणिक धोरण
केंद्र सरकारने 2020 मध्ये नवे राष्ट्रीय शैक्ष्ाणिक धोरण मंजुर केले आहे. त्याची अंमलबजावणी आता करण्यात येत आहे. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फेही याबाबत विद्यापीठातील सर्व विभागांसह संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विविध राजकीय विद्यार्थी संघटना यांना बोलावून त्याबाबतची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच जळगाव आकाशवाणी केंद्रावरून दर सोमवार व शुक्रवारी उत्तुंग भरारी या सदरात नव्या शैक्ष्ाणिक धोरणाबाबत माहिती देण्यात येेत आहे. प्राचार्यांसारखे वरिष्ठ पदच नसेल तर या नव्या शैक्ष्ाणिक धोरणाचा प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे.