जळगाव : शहरातील रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’च्या वसतिगृहातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. मूळ बीड येथील रहिवासी असलेला अभियांत्रिकी विश्वंभर खडके हा विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईएनटीसी’च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसात याप्रकणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी महाविद्यालयात ‘मिसमॅच डे’ हा कार्यक्रम होता.दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो तेथून वसतिगृहात परतला.संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा ‘रुममेट’ शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत खोलीवर परतला तेव्हा दरवाजा आतून लावलेला होता. शिवमसिंहने विश्वंभरला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर शिवमसिंहने दरवाजा जोरात लोटला असता कडी उघडली व त्याला विश्वंभरने गळफास घेतल्याचे दिसले. ते दृष्य पाहताच शिवमसिंह खाली गेला व इतर विद्यार्थ्यांसह त्याने ती माहिती रेक्टरला दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आले. नंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.