खळबळजनक! जळगाव शहरात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव:   शहरातील बी.जे.मार्केट परिसरात एका ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत वृध्दाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार,जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट परिसरात असलेल्या दुकान नंबर-२१ जवळ एका अनोळखी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत वृद्धाची ओळख पटवावी, असे आवाहन पोलिसांनी नातेवाईकांना केले आहे.पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.