खान्देश ही कलाकारांची, संताची भूमी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : खान्देश ही कलाकारांची, संताची भूमी आहे. या भूमीतील लोककलेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आपण लोककलाकारांनी नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त करीत या आपल्या समृद्ध कला व परंपराचे जतन करण्यासाठीच या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या समारोपदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकाश लोखंडे, सिने अभिनेत्री रिकू राजगुरु मंचावर उपस्थित होते. या महोत्सवात आमच्या भगिनींच्या कष्टानी निर्माण झालेल्या बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूचे स्टॉल, खानदेशच्या खाद्य संस्कृतीची ओळख देणारे स्टॉल उभारले गेले. त्यातून त्यांची आर्थिक उलाढाल झाली. हे बळ त्यांना आर्थिक स्थिरता मि ळवून देण्यासाठी मदतीचं ठरेल. त्यामुळे असे महोत्सव दर वर्षी घेण्याचा आमचा मानस जळगाव सांस्कृतिक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची हिच्या आगमनावेळी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महासंस्कृती महोत्सवातील पाचही दिवस मुक्ताई सरस प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातील गायत्री बचत गट, पळसखेडे, जय जिजाऊ बचत गट शिरोड आणि वडनगर येथील बचत गटाच्या महिलांचा प्रतिनिधीक गौरव केला. वसंत कानेटकर लिखित जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा हे नाटक. या ऐतिहासिक नाटकालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अपूर्वा वाणी यांनी महासंस्कृती महोत्सवाचे पाचही दिवस सूत्रसंचालन केले.