जळगाव : गर्भवती महिलेस शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल सिझर शनिवार, केले. करून १८ रोजी दुपारी प्रसूतीत मातेने बाळाला जन्म दिला. मात्र त्याने श्वास घेतला नाही. त्यापाठोपाठ बाळाची आई श्रध्दा जयेश सुतसोनकर हिने सोमवार, २० रोजी सकाळी ८.३० वाजता जगाचा निरोप घेतला. खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने मायलेकचा मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला.
महिलेचे सासरे राजेश भीमराव सुतसोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रध्दा सुतसोनकर ही गर्भवती होती. तिला ४ जून ही प्रसूति तारीख येथील खासगी डॉक्टरांनी दिली. होती. शनिवार, १८ रोजी महिलेस ट्रीटमेंटसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये तिचे पती जयेश सुतसोनकर यांनी सोबत आणले. पूर्वमाहिती न देता तिची सोनोग्राफी दुपारी दोन वाजता डॉक्टरांनी केली. त्यानंतर तिला अॅडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार विवाहितेला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दुपारी २.१५ वाजता विवाहितेचे सिझर केले व तिने नवजात बाळास जन्म दिला. नाळ कापल्यानंतर बाळाला ऑक्सिजन दिला. मात्र त्याचा मृत्यू झाला. बाळाच्या आईची प्रकृती बरी आहे. दोन ते तीन दिवसात औषधोपचारानंतर तिची प्रकृती चांगली होईल, असे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना सांगितले.नवजात बाळाला घेऊन नातेवाईक पहूर येथे गेले. त्याठिकाणी बाळाचा विधी आटोपून जळगाव येथे बाळाच्या आईला दाखल केलेल्या हॉस्पिटलमध्ये नातेवाईक रात्री ९ वाजता परतले. नातेवाईकांनी महिलेच्या तब्येतीबद्दल विचारणा केली असता तिची प्रकृती कंट्रोलमध्ये असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
दोन तासांनी आले डॉक्टर
रात्री दोन वाजेच्या सुमारास महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाली. नातेवाईकांनी तत्काळ डॉक्टरांना फोन करुन माहिती दिली. हा प्रकार कळताच मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी त्यांना समाधानकारक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पहाटे चार वाजता डॉक्टरानी महिलेस अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी महिलेचा हात धरत तिला खाली उतरविले.
रविवार, १९ रोजी पहाटे पाच वाजता विवाहितेला नातेवाईकांनी त्यांच्या वाहनात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. याठिकाणी महिलेवर उपचार सुरू झाले. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेस तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्यानुसार रात्री नऊ वाजता शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये महिलेस हलविले. उपचाराला प्रतिसाद न मिळू शकल्याने महिलेचा सोमवार, २० रोजी सकाळी ८.३० वाजता मृत्यू झाला.
महिलेवर सोनोग्राफी केली, त्यानंतर प्रसृती केली. त्यापाठोपाठ बाळाचा मृत्यू त्यानंतर महिलेची प्रकृती गंभीर होणे, याला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन सबंधितावर कारवाई व्हावी, अशी मागणी राजेश सुतसोनकर यांनी शासकीय रुग्णालयात केली.