---Advertisement---

गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाच मृत्यू,, संसार उपयोगी साहित्य जाळून खाक

by team
---Advertisement---

अमळनेर:  तालुक्यातील पिंपळी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. ही घटना २४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली, या आगीमध्ये एका जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.घटनेची माहिती कळताच नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या साधनाचा वापर करुन प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात आली नाही. यानंतर अमळनेर अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले.

मिळालेल्या माहितीनुसार,  याबाबत अधिक माहिती की, होळीच्या दिवशी रविवारी २४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिलीप पाटील यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. लाकडी छत व घरात कापूस साठवून ठेवला असल्याने आगीने लागलीच रौद्ररुप धारण केले. यामुळे संपूर्ण घराला आग लागली. दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि नात लागलीच घराच्या बाहेर पळत आले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment