जळगाव : घटनेत ८० वेळा बदल करण्याचे पाप कॉंग्रेसने केले. घटनेतील मूलभूत तत्व बदलता येत नाही. त्यातील कलम बदलविता येते. त्यात दुरूस्ती करता येते. मात्र महाविकास आघाडीकडून संविधान बदलविण्यासंदर्भात अपप्रचार केला जात असत्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी १० रोजी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील महायुतीचे समन्वयक आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, पाचोरा- भडगावचे आमदार किशोर पाटील, पारोळा-एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, माजी खासदार ए.टी. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, माजीआमदार दिलीप वाघ, माजी आम दार साहेबराव घोडे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी आमदार चंदुभाई पटेल, जळगाव लोकसभाप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, भाजप जळगाव म हानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, शिवसेनेच्या सरिता कोल्हे, आरपीआय (आठवले) चे आनंद खरात, अनिल अडकमोल कवाडे ना. गडकरी पुढे म्हणाले की, ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. तुमचे भविष्य
देशाला जोडणाऱ्या नव्या मार्गाचा विकास…
काँग्रेसने ६० वर्षांच्या सत्ता काळात शेती, सिंचन व प्रक्रिया उद्योगाला महत्व दिले नाही. त्यामुळे खेड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांच्या काळात प्रक्रिया उद्योग व बचत गटाच्या उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे देशात लघुउद्योगांना चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांना चालना देण्यासाठी रस्ते महत्वाचा घटक आहे. जळगाव- सुरत-नाशिक-अहमदनगर-कोल्हापूर-दिल्ली हा मार्ग नव्याने विकसित होऊन तो थेट कन्याकुमारीपर्यंत जाणार असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.
बदलवायचे असेल तर आपल्याला शिवराज्य, रामराज्य आणावे लागेल. सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील तर आतंकवाद संपविण्यासाठी आणि देशात सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा मोदींशिवाय पर्याय नाही. कुणी जात पंथाने मोठा होत नाही, कार्यान मोठा होतो. ज्यांचा कार्य कर्तृत्वावर निवडून येता नाही, ते जातीची भाषा करतात. भारत जगात विश्वगुरू होण्यासाठी आणि देशाला जगात तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. काँग्रेस ६० वर्ष सत्तेत राहिली. मात्र मोदींना १० वर्षात अनेक योजना आणल्या. योजना देताना ताज, धर्म या बाबींचा विचार कधीही
झाला नाही. मुस्लिम समाजालाही या योजनांचा लाभ देण्यात आला. शेतकरी समृध्द होण्यासाठी व व्यापार व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुन्हा मोदींना संधी देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
भविष्यात भारत ऊर्जा निर्माण करणारा देश
देशात तंत्रज्ञान, पैशांची कमी नाही. मात्र प्रामाणिकपणाची कमी असल्याचे ते म्हणाले. भारतातील डॉक्टर, इंजिनिअर विविध देशात काम करीत आहेत. त्यामुळे देशात तांत्रिक मनुष्यबळही विकसित होत आहे. ज्ञान, तंत्रज्ञान ही भविष्याची ताकद आहे. कानाकोपयात स्टार्टअप सुरू झाले आहे. कृषी निर्यात तीन
पट झाली आहे. देश विकसनशिल झाला आहे. प्रत्येक गावांचा काम व सुविधांच्या आधारे सुर्खाक काढला पाहिजे, असे ना.गडकरी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर खेड्यात ९० टक्के लोकसंख्या होती. मात्र काँग्रेसच्या ५० वर्षाच्या सत्ता काळात रोजगारअभावी गावातील जनता शहरात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्या १० वर्षाच्या काळात भारताची वाटचाल विकसित देश म्हणून सुरू झाली आहे. भविष्यात भारत ऊर्जा निर्माण करणारा देश म्हणून पुढे येईल. भारत ऊर्जा आयात नाही तर निर्यात करणारा देश बनेल, असेही त्यांनी सांगितले.
देशातील शेतकरी इथेनॉलची निर्मिती करून इंधनदाता झाला पाहिजे. भारत आत्मनिर्भर होऊन देशातील तरूणाला काम मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांचे टॅक्ट्ररही इथेनॉलवर चालेल. इंडियन ऑइर्त्तल कंपनी लवकरच इथेनॉलचे पंप सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारताचा शेतकरी ऊर्जादाता होईल, असे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर हवाई सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले