जळगाव : चालक तसेच क्लिनर गाडीत झोपले होते. ही संधी साधत भामट्यांनी गाडीच्या टाकीतून डिझेल तसेच गाडीमधून बॅटरी, स्पिकर तसेच पाकीटातील रोकड असा ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालावर हात मारत पलायन केले. रविवार ७ रोजी पहाटे महामार्गावरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील हॉटेलच्यानजिक ही घटना घडली. सागर गोरक्ष ढवण (२९) हे गाडी चालक उल्हासनगर ता. कल्याण येथील रहिवासी आहेत.
त्यांच्या ताब्यातील आयशर क्रमांक एम.एच. ०५ एफजे ३४१९ मध्ये अकोला येथून माल भरुन तो जळगाव एमआयडीसीत खाली करण्यासाठी ते रविवारी गाडी घेवून आले होते. रविवारी रात्री गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर एका पथकाने फूटेजचा घेतला शोध गुन्हा दाखल होताच पोउपनि दत्तात्रय पोटे यांच्यासह पथक घटनास्थळी खाना झाले. गाडीची पाहणी केली. परिसरात सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी शोध घेतला. फुटेजबरोबरच घटनास्थळावर संशयितांचा सुगावा घेण्याच्याकामीही पथक प्रयत्नशीर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
हॉटेलच्या बाजूला गाडी लावून त्यांनी व सोबतचा क्लिनर अशा दोघांनी जेवण केले. त्यानंतर त्याठिकाणी ते गाडीतच झोपले.झोपेत दिसताच चोरीला सुरुवात चालक तसेच क्लिनर दोघे गाढ झोपेत असल्याची खात्री पटल्यानंतर भामट्यांनी मुद्देमाल चोरण्याला सुरुवात केली. गाडीच्या टाकीतून त्यांनी ८ हजार ५०० रुपये किंमतीचे ९० लिटर डिझेल ड्रममध्ये भरले. ४ हजार किंमतीची बॅटरी, चालकाच्या पाकीटातील १० हजाराची रोकड, प्रत्येकी १० हजार किंमतीचे दोन मोबाईल किंमत २० हजार असा ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ि घेत भामटे येथून पसार झाले. पहाटे अडीच ते सकाळी सात वाजेच्या दरम्यान घटना घडली. चालकाला जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.