जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; टॅक्सी 300 फूट खोल दरीत कोसळली

Jammu Kashmir Accident News : जम्मू-काश्मीर मधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत एक प्रवाशी कर कोसळल्याने या अपघातात 10 प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि इतर रेस्क्यू टीम रामबन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातस्थळी बचाव कार्य सुरु आहे. मात्र पावसामुळे बचावकार्यात व्यत्यय येत असल्याची माहिती आहे. या भीषण अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेलो नाही. पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली एक टॅक्सी श्रीनगरहून जम्मू येथे निघाली होती. मध्यरात्री 1.15 च्या सुमारास या टॅक्सीचा अपघात झाला. टॅक्सी 300 फूट खोल दरीत कोसळली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत  10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.