जळगावकरांनो लक्ष्य द्या! हिवाळ्यात आहे पाण्याची ही परिस्थिती तर, उन्हाळ्यात कशी राहणार?

जळगाव : जिल्ह्यातील प्रकल्प,धरणे समाधानकारकपणे पाऊस न झाल्याने अपेक्षेपणे भरले नाही. यासोबतच पिकांचा पाहिजे तसा उतारा आला नाही. अल-निनो वादळामुळे यंदा पावसाळा चांगला झालेला नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यातच हिवाळा अद्यापही संपला नसताना जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांम ध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर उचल होत आहे. ऐन हिवाळ्यातील या स्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही भागाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मन्याड धरणात पाण्याचा ठणठणाट यंदा जिल्ह्यातील ७० टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही.

सध्या स्थिती जिल्ह्यातील धरणांमध्ये जवळपास ६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा जलसाठा ८१ ते ८२ टक्क्यापर्यंत होता. याचाच अर्थ यंदा १६ टक्के जलसाठा कमी असल्याचे स्पष्ट होते. चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर,जामनेर तालुक्यांना पाणीटंचाई च्या झळा पोहचू लागल्या आहेत. हिवाळा सुरु असताना टँकरसाठी ६०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, हेच दर उन्हाळ्यात १००० ते १२०० रुपयापर्यंत पोहचतात. यंदा हे दर २००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा टक्केवारी

हतनूर- ९७.३०

गिरणा ४१ ते ४२

वाघूर ८६ ते ८७

सुकी- ९४ ते ९४.५०

अभोरा – ९४.०४

मंगरुळ -९२.४०

मोर- ९३.१५

गूळ ८४.३७

अंजनी – ६२.३१

भोकरबारी २७.९०

बोरी ४८.६०

मन्याड -००

अग्नावती २९.३८