जळगावकरांनो लक्ष घ्या! तापमान तब्बल ४२ पार

जळगाव :  ढगाळ वातावरण व सौम्य वारा यामुळे यावर्षाच्या सुरवातीचे काही आठवडे तापमान सुसह्य गेले. मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी बहुतांश शहरात या हंगाम ातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, गतवर्षाच्या तुलनेत तापमान अधिक असल्याचे दिसून येत आहे. किमाल तापमानात सातत्याने वाढ कोरडे शुष्क हवामान रखरखीत हवामानामुळे जळगाव शहर व जिल्हा परिसराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गत सप्ताहात सोमवार ते बुधवार दरम्यान तापमान ३७ अंश होते.

तर गुरुवार, शुक्रवारी तापमानाचा पारा ३७.५ अंशादरम्यान होता. विशेषतः पारोळा, अमळनेर, भङगाव, पाचोरा पट्ट्यात शनिवारी पारा ३८ ते ३९ अंशांवर होता. तो रविवारी एक अंशांनी वाढून ३९.७/८ पर्यंत गेला. जिल्ह्यात बहुतांश तालुका परिसरात हवामान कोरडे, शुष्क असल्याने तापमानाची तीव्रता अधिकच जाणवून येत असून सोमवार, २७ रोजी तापमानाने तब्बल ४१ चा टप्पा पार केल्याने सकाळी दहापासून चटके बसत असत्याचे जाणवून आले आहे.  त्यामुळे दुपारच्या वेळी बाजारपेठ, महत्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक काही अंशी मंदावली असल्याचे दिसून आले आहे. आकाश सकाळपासूनच निरभ्र होते. दरम्यान, हवामान विभागाने या सप्ताहात किमान दीड ते दोन अंशाने तरी तापमानात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात बहुतांश तालुक्यातील तापमान
जळगाव, भुसावळ, भडगाव, पाचोरा, चोपडा, धरणगाव, जामनेर, पारोळा, रावेर ४२ तर अमळनेर, बोदवड, चाळीसगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, यावल ४१ असे तापमानासह सरासरी ४३ तापमान नोंदवले गेले आहे.