जळगाव: शहरात गेल्या काही दिवसांपासून सूर्य नारायणाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. जळगावसह राज्यातील अनेक भागात तापमान ४५ अंशापर्यंत गेल्याने उन्हाच्या प्रचंड झळा बसत असून उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. यातच हवामान खात्याने जळगावसह 7 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आजही काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान विभागाने पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे, कोकणात आज पावसाची शक्यता आहे.
या भागात पावसाची शक्यता..
आज दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबईत कोरडं वातावरण पाहायला मिळेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे.