जळगाव : मैत्री करण्याच्या बहाण्याने फ्लॅट वर बोलावत नंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करीत चालकाकडून ६५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला. ही धक्कादायक घटना जळगावच्या तहसील कार्यालयाजवळील एका इमारतीत तसेच आव्हाणे शिवारात घडली. याप्ररकणी जळगाव शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींमध्ये दोन महिलांसह दोन तरुणांचा समावेश आहे.
ब्लॅकमेल करीत लुटणारे रॅकेट सक्रिय जळगाव शहरातील तहसील कार्यालय परीसरात एका इमारतीत असलेल्या एका फ्लॅटमधे एका महिलेने एका वाहन चालकास मैत्री करण्याच्या बहाण्याने बोलावले. चालक इमारतीत संबंधित महिलेला भेटण्यास गेला. त्याठिकाणी अगोदरच एक महिला व तिच्यासोबत दोन पुरुष साथीदार हजर होते. तिघांनी संगनमत करत त्या वाहनचालकाला मारहाण करीत त्या महिलेसोबतचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्या व्हिडीओच्या बळावर नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच चौघांनी मिळून चालकाकडून ६५ हजार रुपये किंमतीचे दागिने, मोबाईल व रोकड असा एकूण ६५ हजारांचा ऐवज काढून घेण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
ब्लॅकमेलिंग करणारे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तयार करण्यात आलेला अश्लिल व्हिडीओ नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत चालकाकडून अजून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. ती वसूल करण्यासाठी त्याला आव्हाणा शिवारात एका जागी नेण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करत आहेत